बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं दिसत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 434 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 387 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 2 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,37,164 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 4658 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16042 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,13,982 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागिरकांना दक्षता घ्यायली हवी, महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-  

खुशखबर! सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्याकडे विनोद म्हणून पाहते- प्रीतम मुंडे

“नवज्योत सिंग सिद्धू म्हणजे पॉलिटिक्समधील राखी सावंत”

मी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, मी माझी भूमिका मांडली आता… – रामदास आठवले

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन होणार ‘या’ वेळेत, मंडळांनी दिली माहिती!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More