बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

मुंबई | मागील काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं दिसत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 301 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 463 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 6 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,55,632 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 3966 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16,244 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,32,829 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यायली हवी, असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

‘त्याचा आणि समीर दाऊद वानखेडेंचा काय संबंध?’; मलिकांनी शेअर केला नवा फोटो

“धर्मांतर पूर्णपणे थांबलं पाहिजे, हे RSSचं कायम मत राहिलंय”

MPSCच्या उमेदवारांसाठी मोठी बातमी; पूर्व परीक्षेच्या अर्जासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

तरूणाईला कमी वयातच का येतोय हार्टअटॅक? समजून घ्या ‘ही’ महत्त्वाची कारणं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More