बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत दररोज हजारांच्या आत नव्या कोरोनाबाधितांची होतेय नोंद, कोरोनामुक्तीचा दर वाढला

मुंबई | महाराष्ट्रासह मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या दोन महिन्यांपासून झपाट्याने वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. परंतु, हळूहळू मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र सध्या दिसून येत आहे. मुंबईतील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस हजारांच्या आत आल्याची सकारात्मक बातमी समोर आली आहे.

आज मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये फक्त 728 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दररोज हजारांच्या पटीत वाढणारी रुग्णसंख्या ही गेल्या काही दिवसांमध्ये आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात 980 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मुंबईमध्ये नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

आतापर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 6 लाख 79 हजार 258 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. तसेच सध्या महापालिका क्षेत्रामध्ये 15 हजार 786 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनामुक्तीचा दर हा 95% असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हळूहळू मुंबईसह एकूणच संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली आहे. पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या –

अखेर बहुप्रतिक्षित आयपीएलचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेपासून होणार उर्वरित सामने

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 150च्या खाली

आनंदाची बातमी! पुणेकरांचं कोरोना मुक्तीकडे पहिलं पाऊल, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

भर मंडपात नवरदेवाचे फाडले कपडे अन्…; व्हायरल झाला व्हिडीओ

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More