बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांची संख्या हजारांच्या आत; कोरोनामुक्तीचा दर 94 टक्यांवर

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आजची  आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 929 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज एकुण 1 हजार 239 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी ही काहीशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 27 हजार 958 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 94 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आजपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 6 लाख 58 हजार 540 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने मुंबईची कोरोनामुक्तीकडे आगेकुच होत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.

रुग्ण वाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील रुग्णसंख्या ही मागच्या काही दिवसात हळुहळु कमी होत असल्याचं पाहायला मिळत  आहे.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात लाॅकडाऊनमध्ये शिथिलता; आता शनिवार-रविवारीही दुकानं राहणार सुरू

…तर कोविड-बिविड काही बघणार नाही, हा संभाजीराजे सर्वात पुढे असेल- संभाजीराजे भोसले

‘मिर्झापूर’मधील ‘या’ अभिनेत्यावर लाॅकडाऊनकाळात आली रामलड्डू विकण्याची वेळ?

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढणार; ‘या’ तारखेला येणार नवी नियमावली

‘आम्हाला कोणाच्याही भांडणात रस नाही, किती वर्ष या वर्गाचा वापर करून घेणार?’; संभाजीराजे कडाडले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More