बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आजची रुग्णसंख्या आली 400च्या खाली

मुंबई | महाराष्ट्रासह मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या दोन महिन्यांपासून झपाट्याने वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. परंतु, हळूहळू मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र सध्या दिसून येत आहे. मुंबईतील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस हजारांच्या आत आल्याची सकारात्मक बातमी समोर आली आहे.

काल मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये फक्त 351 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दररोज हजारांच्या पटीत वाढणारी रुग्णसंख्या ही गेल्या काही दिवसांमध्ये आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात 525 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

आतापर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 07 लाख 07 हजार 654 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. तसेच सध्या महापालिका क्षेत्रामध्ये 06 हजार 161 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनामुक्तीचा दर हा 97% असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हळूहळू मुंबईसह एकूणच संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली पण आता कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या नव्या विषाणूमुळे पुन्हा एकदा राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या –

भारतात टिकटॉक पुन्हा दाखल होणार, ‘या’ नव्या नावासह परतण्याची शक्यता

कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात जानेवारीनंतर सर्वात कमी रूग्णांची नोंद

‘संजय राऊतांनी ‘हे’ काम बंद करावं’; देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना सल्ला

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

राज कुंद्राच्या समर्थनार्थ उतरली गहना; एकता कपूरचं नाव घेत म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More