बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई होतंय कोरोनामुक्त! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र, अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आनंदाची बाब म्हणजे आज मुंबईत नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची नोंद जास्त आहे.

मुंबईत आज दिवसभरात 176 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 467 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 4 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. कोरोना रूग्ण दुप्पटीचा दर आता 1946 दिवसांवर गेला आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 757448 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 3031 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16273 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 735602 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. प्रशासनाच्या कठोर पावलांमुळेच मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर! आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यु नाही

“…त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे”

“पालकमंत्री नसल्याने नगर जिल्ह्यावर कोणाचं लक्ष नाही”

“…नाहीतर नारायण राणेंचं मंत्रिपद जाऊ शकतं”

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना राजेश टोपेंनी केली मदत जाहीर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More