बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; नव्या कोरोनाबाधितांची संख्या 500च्या घरात

मुंबई | महाराष्ट्रासह मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या दोन महिन्यांपासून झपाट्याने वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. परंतु, हळूहळू मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र सध्या दिसून येत आहे. मुंबईतील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 500च्या घरात आल्याची सकारात्मक बातमी समोर आली आहे.

काल मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये फक्त 521  नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दररोज हजारांच्या पटीत वाढणारी रुग्णसंख्या ही गेल्या काही दिवसांमध्ये आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात 685 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

आतापर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 6 लाख 89 हजार 675 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. तसेच सध्या महापालिका क्षेत्रामध्ये 14 हजार 637 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनामुक्तीचा दर हा 95% असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हळूहळू मुंबईसह एकूणच संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली आहे. पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्र अनलॉक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

“मर्दासारखं लढत राहायचं की गुडघे टेकून शरण जायचं, याचा विचार शिवरायांच्या मावळ्यांनी करावा”

विद्यार्थ्यांना जीवन विमा व अपघात विमा संरक्षणासह परीक्षा शुल्क माफी; ‘या’ विद्यापीठाचा मोठा निर्णय

“भाजपचा एकही आमदार फुटला नाही, म्हणूनच दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न”

15 पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत भाजपविरोधी आघाडीसाठी शरद पवार आज घेणार महत्वाची बैठक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपण्यास राज्यसरकार सज्ज; मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सुचना

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More