बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत चढउतार सुरूच, जाणून घ्या आजची आकडेवारी

मुंबई | मागील काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं दिसत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 238 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 276 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आज दिवसभरात 4 जणांनी प्राण गमावला आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,57,272 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 3326 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16,269 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,35,135 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यायली हवी, असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

‘मला हटवलं नाही तर मी…’, समीर वानखेडेंनी दिलं स्पष्टीकरण

शाब्बास पुणेकर! पुण्यात आज एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्युची नोंद नाही

समीर वानखेडे यांना हटवल्यानंतर नवाब मलिकांचं पहिलं ट्विट, म्हणाले…

जाणून घ्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची ताजी आकडेवारी एका क्लिकवर

मोठी बातमी! समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणातून हटवलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More