बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईकरांनी करून दाखवलं; मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येत विक्रमी घट

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 331 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज एकुण 403 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी ही काहीशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 04 हजार 887 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 97 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आजपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 7 लाख 11 हजार 920 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने मुंबईची कोरोनामुक्तीकडे आगेकुच होत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.

रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील रुग्णसंख्या ही मागच्या काही दिवसात हळुहळु कमी होत असल्याचं पाहायला मिळत  आहे. मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीत सुधारणा; पाहा आजचे सकारात्मक आकडे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! तब्बल 11 कोटी शेतकऱ्यांना मिळणार मोदी सरकारकडुन प्रत्येकी 2 हजार रूपये

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम आमच्याच काळातलं, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

#Tokyo_Olympic2021 कांस्यपदक मिळवुन पी.व्ही सिंधु ठरली दोन पदके मिळवणारी पहिली भारतीय महिला

पुणे कोरोनामुक्त होतंय! आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More