Top News देश

महाराष्ट्र-बिहार संघर्षादरम्यान पहिल्यांदाच मुंबई पोलिस आयुक्त मीडियासमोर, म्हणाले…

मुंबई |  सुशांत सिंग आत्महत्या चौकशी प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येऊ लागली आहे. तसंच या चौकशी प्रकरणाला आता वादाची किनार लागली आहे. महाराष्ट्र सरकार विरूद्ध बिहार सरकार असा वाद रंगलेला असताना मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी पहिल्यांदाच मीडियासमोर येऊन महाराष्ट्र पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. (Mumbai CP Parambir Singh Statement On Sushant Suicide Case)

आयुक्त परमवीर सिंह म्हणाले, “अपघाती मृत्यूची नोंद करुन मुंबई पोलिसांनी आधीच तपास सुरु केला आहे. आम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट, डॉक्टरांच्या टीमचा सल्ला घेतला आहे. नैसर्गिक मृत्यू आणि संशयास्पद मृत्यू या दोन्ही बाजूने मुंबई पोलिस तपास करत आहेत” (Mumbai CP Parambir Singh Statement On Sushant Suicide Case)

“सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबाचा जबाब नोंदवला आहे. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. आमचा तपास सुरू आहे. परंतु पोलीस निष्कर्षावर पोहोचलेले नाहीत.” (Mumbai CP Parambir Singh Statement On Sushant Suicide Case)

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारच्या पाटण्याचे पोलिस अधिक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकने क्वारंटाईन केलं आहे.बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला मुंबई महापालिकेने दिलेल्या वागणुकीमुळे बिहार सरकार नाराज आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार याच प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारशी बोलणार आहे

महाराष्ट्र सरकारशी याबाबत चर्चा करणार असून, आमच्या पोलीस अधिकाऱ्याला दिलेली वागणूक चुकीची असल्याचं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. पोलीस अधिकाऱ्याला अशी वागणूक देणे योग्य नाही, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान,  नियमानुसार एस.पी. विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्याचं स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकने दिलं आहे. तर सुशांत केसमध्ये महाराष्ट्र पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालला आहे, असं वक्तव्य करत मुंबई पोलिसांची पाठराखण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जगातील ‘ही’ मोठी कंपनी TikTok खरेदी करण्याच्या तयारीत!

“हिंदूंना धडा शिकवण्यासाठी…”,आपच्या निलंबित नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा!

बिहार-महाराष्ट्र आमनेसामने, त्या प्रकरणावरून नितीश कुमार थेट ठाकरे सरकारशी बोलणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या