फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा मोर्चा, दादरमध्ये वातावरण तंग!

मुंबई | फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मुंबई काँग्रेसकडून आज मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना आणि मनसेचं वर्चस्व असलेल्या दादरमध्ये हा मोर्चा काढण्यात येतोय. 

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मालाडमध्ये देखील फेरीवाला सन्मान मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला होता. 

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलेलं असल्यानं पोलिसांनी सावध भूमिका घेत दादरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. तसेच अनेक व्यापारी तसेच दुकानदारांनी देखील आपली दुकानं बंद ठेवली आहेत.