“हॅलो, मी आईची हत्या केली आहे”; ‘त्या’ एका कॉलमुळे आख्खी मुंबई हादरली

Mumbai News: आई नेहमी मोठ्या बहिणीचे कौतुक करत असल्याच्या रागातून पोटच्या मुलीनेच ७१ वर्षीय आईची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी चुनाभट्टी (Mumbai) परिसरात घडली. रेश्मा काझी (४१) असे या निर्दयी मुलीचे नाव असून हत्येनंतर तिने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आईची हत्या केल्याचा फोन तिनेच आपल्या भावाला केला होता.

मोठ्या बहिणीबद्दल आईला होती आपुलकी-

कुर्ला (Mumbai) येथील कुरेशी नगर परिसरात राहणाऱ्या साबीराबानू शेख (७१) यांची राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांना जैनब्बी नौशाद कुरेशी (४२) आणि रेश्मा या दोन मुली आणि एक मुलगा आहे. या सर्वांचे लग्न झाले असून ते आईपासून काही अंतरावर राहतात. जैनब्बी या आईची काळजी घ्यायच्या, त्यामुळे साहजिकच साबीराबानू यांना देखील मोठ्या मुलीची ओढ जास्त होती. त्या नेहमीच जैनब्बीचे कौतुक रेश्मासमोर करायच्या.

रेश्माने आईला का संपवले?

गेल्या तीन महिन्यांपासून साबीराबानू यांच्या डाव्या डोळ्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्यांची ये-जा जैनब्बी यांच्याकडे वाढली होती. तसेच त्या कधी रेश्माकडे गेल्यानंतरही तिथे जैनब्बीचे कौतुक करत असल्याने रेश्माचा राग आणखीनच वाढत होता. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्या रेश्माकडे गेल्या असता, पुन्हा जैनब्बीचे कौतुक केल्याने रेश्माने रागाच्या भरात आईवर चाकूने सपासप वार केले. आईने प्राण सोडल्याचे लक्षात येताच तिने भावासह नातेवाईकांना कॉल करून हत्येची माहिती दिली.

Mumbai News: पोलिसांत गुन्हा दाखल-

घटनेची माहिती मिळताच जैनब्बीने रेश्माचे घर गाठले. तेव्हा रेश्मा घरात नव्हती. तर, आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आल्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ पोलिसांच्या मदतीने आईला जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. जैनब्बी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

२०२१ मध्ये बहिणीसोबत झाला होता वाद-

जैनब्बीचे आईकडून होणारे कौतुक रेश्माला सहन होत नव्हते. यावरून रेश्माने बहिणीसोबत वादही घातला होता. हे प्रकरण २०२१ मध्ये चुनाभट्टी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र आता तीन वर्षानंतर या वादाचं रुपांतर थेट आईच्या हत्येमध्ये झालं त्यामुळे या घटनेनं आख्खी मुंबई हादरल्याचं चित्र आहे.

News Title: Mumbai Daughter Kills Mother for Favoring Elder Sister

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! ‘आरोपींनी संतोष देशमुख यांचा खून एन्जॉय केला?’, पोलिसांचा गौप्यस्फोट

“अजितदादा क्या हुँआ तेरा वादा…”; आकाच्या आकाची जेलवारी निश्चितच!

वाल्मिक कराड नाहीतर हा आहे ‘आका’; वकिलाच्या दाव्यानं सगळीकडे खळबळ

सुदर्शन घुले, सुधीर सांगळेचा गेमओव्हर, केज कोर्टात झाला मोठा निर्णय!

सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जायला पैसे ‘या’ व्यक्तीने पुरवले!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .