“मुंबई कोणाच्या बापाची नाही”
मुंबई | सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कर्नाटक विरोधात ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. परंतु कर्नाटच्या काही मंत्र्यांनी मुंबईमध्ये(Mumbai) 20 टक्के लोक कन्नड भाषिक राहतात. त्यामुळं मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाही करा अशी मागणी केली आहे.
आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, मुंबईवर दावा आहे, हे सांगणं खपवून घेतलं जाणार नाही. त्याबद्दल आम्ही निषेध जाहीर करतो. विरोधी पक्षनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तसं निषेध पत्र पाठवू.
तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांच्या समोर जे ठरले आहे त्याचं कर्नाटक पालन करत नाही, हे गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले जाईल, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
मी पुन्हा एकदा सांगत आहे की, मुंबई महाराष्ट्राची आहे, ती कोणाच्या बापाची नाही. मुंबईवर कोणी दावा केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा फडणवीसांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.
सरकारच नाही तर संपूर्ण सभागृह म्हणून याचा निषेध आहे. आणि या सभागृहाच्या भावना केंद्रीय गृहमंत्री आणि कर्नाटक सरकार(Karnataka Govrment) पर्यंत पोहचवले जातील, असं आश्वासनही फडणवीसांनी यावेळी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.