Mumbai Gang Rape | महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. हे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Mumbai Gang Rape)
मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 12 वर्षांच्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं उघड झालंय.
जोगेश्वरी परिसरात घडली धक्कादायक घटना
मुलीला एकटे बघून हे नराधम मुलीला त्यांच्या संजय नगर जोगेश्वरी येथील घरी घेऊन गेले आणि त्यानंतर या नराधमांनी मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जातोय.
या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असल्याची माहिती आहे. आरोपी एसी मेकॅनिक असल्याची माहिती आहे. अल्पवयीन मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना पोलिसांना संशय आला. त्यांनी तिची विचारपुस केली. तसेच जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क केल्यानंतर एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झालं असल्याची तक्रार आल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर त्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं. (Mumbai Gang Rape)
पीडित मुलीच्या जबाबानंतर गुन्ह्यात सामूहिक बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्स) कायदा अंतर्गत कलमाची वाढ करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.