मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र दिसुन येत आहे, त्यातच मुंबईमधुन एक धक्कादायक माहीती समोर आली आहे. मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना आता कोरोनाची लक्षणं नसलेल्या व्यक्तींचीही कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह येत असल्याचं दिसुन येत आहे.
मुंबईमध्ये सध्या 30 हजारांहुन अधिक कोरोनाबाधित रूग्ण दररोज सापडत असल्याने प्रशासनाच्या अडचणीत वाढ झालेली आहे. तसेच गेल्या दिड महिन्यात मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या 91 हजाराने वाढली आहे, यापैकी एकुण 74 हजार रूग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नसल्याचं आढळुन आलं आहे.
मागच्या 50 दिवसात एकुण 91 हजार रूग्णांपैकी फक्त 17 हजार रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळुन आल्यानं जवळपास 80 टक्के रूग्णांमध्ये लक्षणं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबईमध्ये एकुण 9900 रूग्णालयातील खाटा कोरोना बाधितांनी भरल्या आहेत, तसेच आता आणखी रुग्णालय ताब्यात घेण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचं महापालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे. ज्या रूग्णांना कोरोनाची लक्षणं नाहीत अशा रूग्णांच्या हातावर शिक्का मारून त्यांनी घरीच राहण्याचे आदेश देण्यात येत आहेत. तसेच या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
थोडक्यात बातम्या –
सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप
1 एप्रिलपासून ‘या’ वयोगटापुढील व्यक्तींना मिळणार कोरोना लस, असा लावा नंबर!
“…तर सचिन तेंडूलकर, लक्ष्मण आणि गांगूली कधीच पास झाले नसते”
मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याला पोलिसांनी केली अटक
मुंबईतील ‘ही’ पाच ठिकाणं अत्यंत धोक्याची, काम नसेल तर जाणं टाळा!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.