महाराष्ट्र मुंबई

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; मुंबईसाठी रेड अलर्ट जारी

मुंबई | राज्यातील मान्सून आता चांगलाच सक्रिय झाला आहे. काल रात्रीपासून कोकणसह मुंबईतील काही भागांत जोराचा पाऊस कोसळत आहे. शहरातील उपनगरांत होत असलेल्या पावसामुळे हवामान खात्याने मुंबईसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासांत जोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

मुंबईव्यतिरिक्त ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कालपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे.

मुंबईत पावसाचा जोर अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर शहरात दुपारी  भरतीची (हाय टाइड) शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान समुद्रात 4.51 मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या काळात समुद्रात न जाण्याचा सावधनतेचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, काल रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हिंदमाता, दादर टी.टी. किंग्ज सर्कल, सायन, चेंबूर, अंधेरी, सांताक्रूझ या भागांमध्ये पाणी साचलं आहे. या पावसाचा उपनगरातील वाहतूक व्यवस्थेवरही विपरीत परिणाम झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘बाॅयकाॅट चायना’ म्हटलं तर ते आत्महत्या केल्यासारखं होईल- रघुनाथ माशेलकर

महाराष्ट्राची आणखी एक संस्था गुजरातला हलवली, दुर्दैव म्हणजे राजकारण्यांनी ब्र देखील काढला नाही!

कोरोना अलर्ट… जागतिक स्तरावर कोरोनाचा मृत्यूदर तब्बल ‘इतक्या’ पटीनं वाढला!

पुणेकरांना दिलासा! एकाच दिवशी मिळाल्या ‘या’ दोन बड्या गुडन्यूज

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे- अनिल देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या