बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंदाकिनी खडसेंना तुर्तास तरी अटक नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मंदाकिनी खडसे यांना मंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत त्यांचा अटकपूर्व जामीन अखेर मंजूर केला आहे. मंदाकिनी खडसेंना तुर्तास तरी अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

सत्र न्यायालयाने याआधी त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यामुळे त्यांना अटक होण्याची दाट शक्यताही वर्तवण्यात येत होती. यानंतर त्यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान घेत मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मंदाकिनी खडसेंच्या या प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली.

न्यायालयाने मंदाकिनी खडसेंच्या अटकेला तुर्तास स्थगिती देत त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पण न्यायालयाच्या निर्णयानुसार मंदाकिनी खडसेंना 17 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत दर मंगळवार आणि शुक्रवार ईडीसमोर हजर रहावे लागणार असून 21 ऑक्टोबरला मंदाकिनी खडसेंना विशेष न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यासोबतच भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आले आहेत. न्यायालयाने मंदाकिनी खडसेंना अंतरीम दिलासा दिला आहे. ईडीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर मंदाकिनी खडसेंची सूटका करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी नोरा फतेहीला ईडीने बजावलं समन्स

SBI च्या ‘या’ भन्नाट योजनेत पैसे गुंतवा आणि मालामाल व्हा, वाचा सविस्तर

‘ट्विट करणाऱ्यांचे संस्कार महाराष्ट्राला कळले’, चाकणकरांचं प्रत्युत्तर

“एनसीबी एवढी मोठी एजन्सी पण गांजा आणि तंबाखूतील फरक कळत नाही”

‘औरंगजेबाच्या औलादी आहेत या पक्षात’; राष्ट्रवादी आमदाराच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे निलेश राणे संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More