बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुम्ही ट्विटरवर उत्तर देता ना, तर मग इकडेही द्या’; न्यायालयाने नवाब मलिकांना फटकारलं

मुंबई | आर्यन खान प्रकरणापासून राज्यात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक विरूद्ध एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे वाद पेटला आहे. नवाब मलिकांनी आत्तापर्यंत कधी ट्विट करत तर कधी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत.

समीर वानखेडे हिंदु नसून मुस्लिम आहेत, वानखेडेंच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव नसून दाऊद असल्याचा आरोपही नवाब मलिकांनी केला होता. नवाब मलिकांनी केलेल्या या आरोपांविरोधात वानखेडेंच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. सुनावणीपूर्वी नवाब मलिकांनी या याचिकेला उत्तर देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत.

या प्रकरणाची सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी होणार असुन तत्पुर्वी मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना फटकारलं आहे. नवाब मलिक तुम्ही तुमचं उत्तर लवकर दाखल करा, असं न्यायालयाकडून बजावण्यात आलं आहे. नवाब मलिक तुम्ही ट्विटरवर उत्तर देऊ शकत असाल तर तुम्ही इथेही कोर्टात उत्तर देऊ शकता, असं न्यायमूर्ती जमादार म्हणाले आहेत.

समीर वानखेडेंच्या वडिलांना नवाब मलिकांविरोधात 1.25 कोटी रुपयांचा अभ्रुनुकसानीचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला. नवाब मलिकांविरोधात ज्ञानदेव वानखेडेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली असली तरी मलिकांचं आरोपसत्र सुरूच आहे. मलिकांनी सोमवारी ट्विट करत समीर वानेडेंची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! दहशतवादी हल्ल्याने जम्मू काश्मीर हादरलं

“वेड्या, भाजप महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे”

“पोलिसांना कलेक्शनसाठी वापरता मग ड्रग्ज रोखण्यासाठी का वापरत नाहीत?”

“पडळकरांच्या जिवाला काही झाल्यास राष्ट्रवादीचे नेते जबाबदार असतील”

“तेच मी माझ्या बंधूंना गेली कित्येक दिवस सांगतोय की…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More