Top News आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

होम क्‍वारंटाइन रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्का, घराबाहेर पडल्यास होणार ‘ही’ कारवाई

Photo Credit- Twitter/ Kishori Pednekar

मुंबई | सांताक्रूझच्या एका हॉटेलमधून क्वारंटाईन केलेले काही प्रवासी पळून गेल्याने प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत आता कठोर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा कहर पुन्हा एकदा सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. क्वारंटाईन असलेल्या बाधित रुग्णांवर आता मुंबई पालिका प्रशासनाचं लक्ष असणार आहे.

लक्षणं नसलेल्या आणि होम-क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना पालिका दिवसातून चार ते पाच वेळा कॉल करून ते घरी असल्याची खातरजमा करणार आहे. बधितांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे किंवा त्यांच्याकडे विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे आणि आता पून्हा होम-क्वारंटाईन केलेल्या रुग्णांच्या हातावर पून्हा शिक्का मारण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका प्रशासन सध्या अँक्शन मोडमध्ये असल्याचं दिसून येत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता पालिकेने हे पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे. पालिकेचे विलगीकरणाचे नियम मोडणाऱ्या बाधित रुग्णांवर वॉर-रूम मार्फत गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियाही होणार आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला असताना नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन मुंबई पालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडून केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या प्रकाशव्यवस्थेवरुन खासदार संभाजीराजे भडकले, म्हणतात…

शिवजयंतीवर निर्बंध मग राष्ट्रवादीचा वशाटोत्सव अन् संमेलनावरही बंदी घाला- संभाजी ब्रिगेड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वशाटोत्सव, शरद पवार उपस्थित राहणार!

गजावरची कारवाई फक्त ट्रेलर, वेळीच सुधरा नाहीतर… ‘या’ अधिकाऱ्याचा इशारा

अर्जुनला विकत घेतल्यावर मुंबई इंडियन्स म्हणते, क्रिकेट त्याच्या रक्तात आहे!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या