Mumbai Indians | आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू आहे. मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या वर्षी आयपीएलच्या हंगामातून बाहेर जावं लागलं. मुंबई इंडियन्स संघ प्ले ऑफमधून बाहेर गेला आहे. आता मुंबई इंडियन्सचा वाद चव्हाट्यावर आला आहे. सध्या हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार आहे. रोहित शर्माला मुंबई इंडियन्स संघातून कर्णधारपदाची धुरा सांभाळायला दिली. यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने म्हणावी अशी कामगिरी केली नाही. त्यांना प्ले ऑफमधून बाहेर पडावं लागलं आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ बाहेर जाण्याचं कारण म्हणजे केवळ हार्दिक पांड्या असल्याचं क्रिकेट क्षेत्रातील काही दिग्गजांनी म्हटलं आहे.
मॅनेजमेंटकडे पांड्याची तक्रार
मॅनेजमेंटकडे पांड्याची काही खेळाडूंनी तक्रार केली आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून तडकाफडकी हटवून त्याजागी हार्दिक पांड्याची नियुक्ती करण्यात आली. हा निर्णय अनेक माजी क्रिकेटपटूंसह मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांना पटला नव्हता.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली. आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स संघ हा एक यशस्वी संघ आहे. मुंबई इंडियन्सचे चाहते पांड्यावर नाराज आहेत.
पांड्याच्या खेळावर आणि संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एवढंच नाहीतर आता पांड्याची तक्रार काही खेळाडूंनी केली आहे. मुंबई इंडियन्स संघातील वाद आता चव्हाट्यावर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
‘या’ खेळाडूंनी केली तक्रार
संघातील रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव यांनी याबाबत तक्रार केल्याचं कळतंय. यानंतर सिनियर खेळाडूंसोबत एक चर्चा झाली. त्यावेळीही याच गोष्टी समोर आल्या. पांड्याने ऐन वेळी संघाचं नेतृत्व करत असताना चुकीचे निर्णय घेतले आहेत, असं एका वृत्तामध्ये म्हटलं आहे.
News Title – Mumbai Indians Captain Hardik Pandya Complaint To Coaching Staff
महत्त्वाच्या बातम्या
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
पुणे हादरलं! पानटपरीवर घडला धक्कादायक प्रकार
संजोग वाघेरे यांना घरातूनच विरोध!, भावकीतील संदीप वाघेरे यांनी दिली तिखट प्रतिक्रिया
‘दीपिका प्रेग्नंट आहे तरी बेबी बंप का दिसेना?’; चाहत्यांना सतावतेय चिंता