बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई इंडियन्सची हार पक्की; RCBचा कर्णधार विराट कोहलीचं मोठं वक्तव्य

चेन्नई | आज ‘आयपीएल’च्या 14व्या हंगामातील पहिला सामना आहे. ही मॅच चेन्नईच्या चिदंबरम मैदानावर खेळली जाणार आहे. मुंबईत ‘आयपीएल’चे 10 सामने खेळले जाणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ‘आयपीएल’ सामने हे वेळापत्रकानुसार आणि वेळेवरच होतील असं सरकारकडून स्पष्ट केलं गेलं आहे. तर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही यावर मोहर लावली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने मुंबई इंडियन्स विरुद्ध यंदाच्या मोसमातील पहिल्या सामन्याआधी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जर सर्व आरसीबी खेळाडूंनी स्वत:वर विश्वास ठेवला असेल तर ते पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवू शकतात, अशी प्रतिक्रिया त्याने सामन्याआधी दिली आहे. विराट कोहलीने हे मान्य केले आहे की, मुंबई इंडियन्स हा एक चॅम्पियन संघ आहे. मात्र, विरोधी संघाच्या कौशल्याकडे आरसीबीने जास्त लक्ष देऊ नये, असेही त्याने यावेळी म्हटलं आहे.

मला असा विश्वास आहे की एक संघ म्हणून आपण आपल्या कौशल्यावर आणि सामर्थ्यावर अवलंबून राहावे. मुंबई इंडियन्स निश्चितच चॅम्पियन संघ आहे. त्यांना ही स्पर्धा कशी जिंकता येईल हे माहिती आहे. त्यामुळे जर आम्ही त्यांच्या कौशल्यांकडे लक्ष दिले तर आम्ही त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. आरसीबीच्या You Tube चॅनलवर तो बोलत होता.

दरम्यान, आरसीबी आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही आयपीएलच्या लोकप्रिय संघांपैकी एक आहेत आणि दोन्ही संघांना त्यांनी या आयपीएलच्या मोसमाची सुरुवात विजयाने करावीशी वाटते. आकडेवारीत मुंबई इंडियन्सचा वरती आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमधील सामन्यांमध्ये मुंबईने 19 वेळा विजय मिळविला आहे, तर आरसीबीने केवळ 10 सामने जिंकले आहेत.

थोडक्यात बातम्या –  

महाराष्ट्रात इतक्या आठवड्याचा लॅाकडाऊन?; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं मोठं वक्तव्य

“लस आहे पण देण्याची ऑर्डर नाही, कोरोनाकाळातील अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकारने….”

“लस उत्सव साजरा करण्यासाठी आधी लस तरी उपलब्ध करून द्या” – जयंत पाटील

IPL 2021 : MI vs RCB, ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

मध्य रेल्वेचा प्लॅटफाॅर्मवरील गर्दी टाळण्यासाठी ‘हा’ महत्वपुर्ण निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More