Mumbai Indians | आयपीएल 2024 चा हंगाम सुरू आहे. यंदाच्या आयपीएलकडं क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे. प्रत्येक आय़पीएलमध्ये अनेकदा अशा काही गोष्टी घडतात त्याची सदैव चर्चा होते. मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू या संघादरम्यान आयपीएल सामना झाला त्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने आरसीबीचा फलंदाज दिनेश कार्तिकची फलंदाजी सुरू असताना त्यांची खिल्ली उडवली आहे.
भर मैदानात दिनेश कार्तिकची केली चेष्टा
शाब्बाश डिके, आपल्याला वर्ल्डकप खेळायचा आहे, असं म्हणत रोहितने हसत हसत दिनेश कार्तिकची खिल्ली उडवली. दिनेश कार्तिकने 23 चेंडूत 53 धावा केल्यात. त्यानंतर त्यात त्याने 5 चौकार आणि 4 षटकार लगावले आहेत. (Mumbai Indians)
Rohit Sharma teased Dinesh Karthik:
“Shabas DK, World Cup khelna hain abhi (brilliant DK, you have to play the World Cup)”. 😄👌 pic.twitter.com/OT2FxTVM5o
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 11, 2024
दिनेश कार्तिकच्या आयपीएलमधील धावा
दिनेश कार्तिक 2008 पासून आयपीएल खेळत आहे. आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकने एकूण 248 आयपीएलच्या सामन्यांमध्ये 4659 धावा केल्या आहेत. कार्तिकची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या ही 97 धावसंख्या आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स, पंजाब किंग्ज इलेव्हन, मुंबई इंडियन्स, केकेआर आणि गुजरात टायटन्ससंघात दिनेश कार्तिक खेळला आहे. (Mumbai Indians)
आरसीबीने प्रथम 197 धावांचं टार्गेट दिलं. यामध्ये फाफ डूप्लेसिसने सर्वाधिक 61 धावा केल्या. रजत पाटीदारने 50 तर दिनेश कार्तिकने 53 धावा केल्यात. तसेच विराटने निराशजनक कामगिरी केली. बुमराहने केवळ 3 धावांवर त्याची विकेट घेतली. ग्लेन मॅक्सवेलकडून अनेक अपेक्षा होत्या मात्र त्यालाही खातं उघडता आलं नाही.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल.
News Title – Mumbai Indians players Rohit Sharma Taunt To Dinesh Kartik ‘Batting DK You Have To Play World Cup”
महत्त्वाच्या बातम्या
सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, उचललं मोठं पाऊल
आरसीबी विरुद्ध विकेट्सचा ‘पंच’, बूमराहने पटकावली पर्पल कॅप
11 अफेअर्स करत विवाह न करता अभिनेत्री झाली आई, कारण आलं समोर
विराटकडे असलेली ऑरेंज कॅप ‘या’ खेळाडुकडे जाणार?, टॉप 5 मध्ये कोण?
“निवडून द्या अन्यथा…”, नितेश राणेंची सरपंचांना धमकी