बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई इंडियन्स बचके रहना रे बाबा; पहिल्याच सामन्यात RCBचे हे 3 खेळाडू करु शकतात शतक!

चेन्नई | आज ‘आयपीएल’च्या 14व्या हंगामातील पहिला सामना आहे. ही मॅच चेन्नईच्या चिदंबरम मैदानावर खेळला जाणार आहे. मुंबईत ‘आयपीएल’चे 10 सामने खेळले जाणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ‘आयपीएल’ सामने हे वेळापत्रकानुसार आणि वेळेवरच होतील असं सरकारकडून स्पष्ट केलं गेलं आहे. तर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही यावर मोहर लावली आहे.

आरसीबी आणि मुंबई इंडियन्सकडे अनेक उत्तम खेळाडू आहेत. हा सामना चेन्नईच्या चिदंबरम मैदानावर होणार आहे. हे दोन्ही संघांचे होम ग्राउंड नाही. यावेळी आयपीएलमध्ये कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर स्पर्धा घेत नाहीये. मात्र, आजच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीचे 3 दिग्गज फलंदाज शतक करु शकतात. त्यात ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीचा समावेश आहे.

दोन्ही संघात अनुभवी फलंदाजांच्या उपस्थितीमुळे बर्‍याच धावा देखील केल्या जाऊ शकतात. असे बरेच फलंदाज आहेत जे जलद  खेळू शकतात. अशा परिस्थितीत एखाद्या खेळाडूने शतकही केले तर आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. विशेष म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फलंदाजीची ताकद पाहता, त्यांच्याकडून शतकी खेळी करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आरसीबी आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही आयपीएलच्या लोकप्रिय संघांपैकी एक आहेत आणि दोन्ही संघांना त्यांनी या आयपीएलच्या मोसमाची सुरुवात विजयाने करावीशी वाटते. आकडेवारीत मुंबई इंडियन्सचा वरती आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमधील सामन्यांमध्ये मुंबईने 19 वेळा विजय मिळविला आहे, तर आरसीबीने केवळ 10 सामने जिंकले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! राज्य सरकारचा मोठा निर्णय; MPSC परीक्षा पुढे ढकलली

“लस आहे पण देण्याची ऑर्डर नाही, कोरोनाकाळातील अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकारने….”

“लस उत्सव साजरा करण्यासाठी आधी लस तरी उपलब्ध करून द्या” – जयंत पाटील

IPL 2021 : MI vs RCB, ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

मध्य रेल्वेचा प्लॅटफाॅर्मवरील गर्दी टाळण्यासाठी ‘हा’ महत्वपुर्ण निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More