बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पांड्या इज बॅक! सलग तीन पराभवानंतर मुंबईची गाडी विजयी पथावर, पाहा व्हिडीओ

मुंबई | सलग तीन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारलेल्या मुंबई इंडिअन्स संघाने अखेर विजयाची चव चाखली आहे. पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या हार्दिक पांड्याने केलेल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने पंजाबवर विजय मिळवला आहे. हार्दिकने षटकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनीही हा निर्णय सार्थ ठरवत पंजाबला सुरूवातीला धक्के दिले. कृणालने मनदीप सिंगला बाद करत सलामीची जोडी फोडली. त्यानंतर पोलार्डच्या गोलंदाजीवर स्फोटक फलंदाज ख्रिस गेल अवघ्या 1 धावेवर बाद झाला त्यानंतर राहुलही बाद झाला. त्यामुळे पंजाबची फलंदाजी गडगडली होती.

पंजाबला मोठी धावसंख्या उभारता आली नाही, पंजाबकडून सर्वाधिक मार्कमने 42 धावा केल्या तर त्यापाठोपाठ दीपक हुड्डाने 28 धावा जोडल्या आणि पंजाबने मुंबईच्या संघाला 136 धावांचं आव्हान दिलं. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मुंबईची सुरूवातही निराशाजनक राहिली कारण सलामीवर रोहित शर्माला रवी बिष्णोईने बाद करत पहिला धक्का दिला त्यापाठोपाठ सुर्यकुमारलाही त्याने पहिल्याच चेंडूवर माघारी धाडलं. त्यामुळे मुंबई मोठ्या अडचणीत सापडली होती.

दरम्यान, सुर्यकुमार बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या सौरभ तिवारी आणि डिकॉक यांनी डाव सांभाळला होता. मात्र दोघे बाद झाल्यानंतर आलेल्या पांड्या आणि पोलार्ड जोडीने विजय मिळवून दिला. पांड्याने 40 धावांची खेळी केली यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

 

थोडक्यात बातम्या-

भावा तूच रे! कृणाल पांड्याच्या खिलाडूवृत्तीमागे हिटमॅन रोहितचाही हात, पाहा व्हिडीओ

…तर आपलं सीट शंभर टक्के निवडून आलं समजा- सुप्रिया सुळे

प्रिती आणि रितेशच्या व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडीओवर जेेनेलिया म्हणाली…

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More