नारळाचं झाड अंगावर पडून दुरदर्शनच्या माजी अँकरचा मृत्यू

मुंबई | नारळाचं झाड अंगावर पडल्याने दुरदर्शनच्या माजी अँकर कांचन रघुनाथ यांचा मृत्यू झालाय. त्या मॉर्निंग वॉकला जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला.

दरम्यान, सोसायटीने १७ फेब्रुवारीला हे झाड कापण्यासाठी अर्ज केला होता. तसंच यासाठी आवश्यक १३८० रुपयांची रक्कमही भरण्यात आली होती.

 मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी झाडाची पाहणी केली. झाड मजबूत असून ते कापण्याची आवश्यकता नाही, असा अहवालही सोसायटीला दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कांचन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय. 

पाहा व्हिडिओ-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या