बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई कोरोनामुक्त होतंय! नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; वाचा आकडेवारी

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र, अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आनंदाची बाब म्हणजे आज मुंबईत नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची नोंद जास्त आहे.

मुंबईत आज दिवसभरात 259 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 391 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 9 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

मुंंबईत सध्या 221 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,35,371 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 4744 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 15,908 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,12,311 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. प्रशासनाच्या कठोर पावलांमुळेच मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा काय सुरू, काय बंद?

दोन दिवसांनंतर सोन्याच्या दरात मोठे बदल, वाचा ताजे दर

ह्रदयद्रावक! पुण्याच्या वेदिका शिंदेचा अखेरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

अखेर मुहूर्त ठरला! उद्या दुपारी 4 वाजता बारावीचा निकाल होणार जाहीर

सावधान राहा! ‘हे’ पाच पदार्थ पुन्हा गरम करुन खाऊ नका, कारण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More