बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जगात जे काही सर्वोत्तम आहे, ते मुंबईला देण्याचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

मुंबई | मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमध्ये जागतिक दर्जाचा केंब्रीज बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेणार आहे. या संदर्भातील माहिती राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईतील शाळांच्या संदर्भात आदित्य ठाकरे एका कार्यक्रमात बोलत होते.

जगभरात जे काही सर्वोत्तम आहे, ते मुंबई शहरासाठी आपण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. लवकरच मुंबईत केंब्रीज बोर्डाची स्थापना करणार असल्याचं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. आजचा दिवस मुंबईकरांसाठी आनंदाचा आहे. महापालिकेच्या शाळा अधिक चांगल्या कशा सुधारता येतील यावरच आपला भर आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

एसएससी सोबतच सीबीएसई, आयसीएसई बोर्ड महापालिकेच्या शाळेत सुरू केले आहेत. सीबीएसई, आयसीएसई मध्ये प्रवेशासाठी लॉटरी काढावी लागत आहे. इतका प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे केंब्रीज बोर्डाच्या शाळाही लवकरच सुरू करत आहोत. मुंबईतील प्रत्येक प्रभागात एक शाळा सुरू करण्यासाठी सामंजस्य करार करत असल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीपासून नवीन अभ्यासक्रम सुरू होईल. यामध्ये मराठी विषय हा बंधनकारक असणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा चांगल्याप्रकारे देता येतील यावर आपला भर आहे. अभ्यासक्रमासोबतच खेळांना सुद्धा प्रोत्साहन देत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या –

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ सहा पिकांच्या MSPमध्ये वाढ

धक्कादायक! तालिबान्यांच्या भीतीने देश सोडून गेलेल्या नागरिकांना ‘या’ शेजारी राष्ट्राने हाकललं

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने, संपुर्ण महाराष्ट्रांचं लक्ष!

“राज्यात मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री भ्रष्टाचारी, काही मंत्री भाई लोकांची मदत घेत आहेत”

करूणा शर्मांना न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर पोलिसांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More