कांजूरमार्गच्या सिनेविस्टा नावाच्या स्टुडिओला मोठी आग

मुंबई | मुंबईमध्ये लागणाऱ्या आगीचं सत्र सुरुच आहे. आता कांजूरमार्गच्या गांधीनगर भागातील सिनेविस्टा नावाच्या स्टुडिओला मोठी आग लागलीय.

आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

आठवड्याभरापूर्वीच लोअर परेलच्या कमला मिल्समध्ये आग लागली होती. ज्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, सिनेविस्टामध्ये लागलेल्या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.