बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! मुंबई लोकलसेवा सुरू, मात्र काढावा लागणार ‘हा’ पास

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुंबईकरांचं लक्ष लागून असलेल्या लोकल सेवेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. स्वातंत्रदिनादिवशीपासून लोकल सेवा चालू होणार आहे. मात्र यासाठी नागरिकांना त्यांचे कोरोना लसीचे दोन डोस घ्यावे लागलेले असतील. त्यासोबतच एक पास काढावा लागणार आहे.

दोन डोस घेतलेल्यांना लोकल सेवेचा लाभ घेता येणार आहे. मात्र त्यासाठी तुमचं एका अॅपवर रजिस्टर असणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यावर त्यांना एक पास मिळणार आहे. तो पास असेल आणि लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 झाले असतील तरच लोकसमधून प्रवास करता येणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

ज्यांच्याकडे फोन नसतील त्यांच्यासाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने हे पास दिले जाणार आहेत. एकदा हे पास आले की मॉल, रेस्टारंट हळूहळू चालू करणार आहोत. लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

दरम्यान, कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पास प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत आणि प्रवास करावा, असं आवाहनही मुख्यमंंत्र्यांनी केलं आहे. धार्मिक स्थळ, हॉटेलबाबत उद्याच्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

मराठे गोष्टी सांगत नाहीत तर ते इतिहास रचतात- उद्धव ठाकरे

“महाराष्ट्रातले भाजपचे नेते मोदींचं पण ऐकत नाहीत”

“राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो हा इतिहास”

“सिद्धार्थ माझा प्रियकर नाही पण तो सतत आजूबाजूला हवासा वाटतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More