बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई लोकल सेवा लवकरच सुरू; क्युआर कोडच्या माध्यमातुन प्रवाशांना काढता येणार पास

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मुंबईत लोकल सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत मोठी घोषणा केली. मुंबई लोकल येत्या 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ज्या लोकांनी लसीचे 2 डोस घेतले आहेत, अशाच लोकांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. त्यासाठी प्रवाशांना एका अॅपचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता हे अॅप लवकरच मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे.

लोकल प्रवासासाठी तयार करण्यात आलेलं खास अॅपचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. येत्या दोन दिवसात हे अॅप कार्यान्वित करण्यात येणार आहे. मुंबईतील एकूण 65 रेल्वे स्थानकावर या अॅपच्या माध्यमातून क्युआर कोड दिला जाणार आहे. या क्युआर कोडच्या माध्यमातून प्रवाशांना तिकिट किंवा पास काढता येणार आहे. तर वाॅर्ड स्तरावर ऑफलाईन सेवेद्वारे तिकिटासाठी क्युआर कोड मिळवता येणार आहे.

दोन डोस घेतलेल्या नागरिकांना फोटो पास देण्यात येणार आहे. हे एकप्रकारचे इम्युनिटी सर्टिफिकेट असेल. या फोटोपासच्या आधारावर प्रवाशांना लोकल प्रवासाचा पास मिळणार असल्याचं मुंबईचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितलं आहे. नागरिकांना देण्यात येणार फोटोपास हा दोन डोस घेऊन 14 दिवस पुर्ण झाले आहेत अशाच नागरिकांना देणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, नागरिकांना देण्यात येणारा फोटोपास फक्त लोकलसाठी नव्हे तर जीम, रेस्टाॅरंट आणि इतर ठिकाणी देखील वापरला जाऊ शकतो. 15 नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील 18 वर्षांवरील 90 लाख नागरिकांचे दोन्ही डोस पुर्ण होतील, असंही इक्बालसिंग चहल यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्याला झिका व्हायरसचा धोका?, पुण्यातील ‘इतक्या’ गावांना संभाव्य धोक्याचा इशारा

आनंदाची बातमी! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

पाकिस्तानच्या अर्शदला पदक मिळालं असतं तर मलाही आनंद झाला असता- नीरज चोप्रा

‘पंतप्रधान मोदींनी माझ्या लोकप्रियतेमुळेच टिकटाॅकवर बंदी आणली’

“मराठीपेेक्षा हिंदी चित्रपटांना झुकतं माप देता, कुठं आहेत शाखरूख, सलमान?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More