Top News मुंबई

लवकरच मुंबईकरांसाठी लोकल सेवा होणार सुरु; ठाकरे सरकारने दिले संकेत

मुंबई | कोरोनाच्या काळात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा बंद होती. मात्र हळूहळू अत्यावश्यक सेवा आणि त्यांनंतर महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली. तर आता सर्वांसाठी लोकल केव्हा सुरु होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

तर लवकरच सर्वसामान्य नागरिकांना लोकलच्या प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना यासंर्भात दिलासा मिळेल असं मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

ट्विटरवर प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याविषयी स्टेकहोल्डर्सशी चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल.”

नुकतंच सरकारने महिलांना काही वेळेत लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली. त्यानंतर आता वकील, खासगी सुरक्षा रक्षक यांनाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या-

‘शरद पवारांनी तो प्रश्न केला आणि….’, तिकीट नाकारण्यासंदर्भात सुजय विखेंचा मोठा गौप्यस्फोट

नितीश कुमार भाजपाला धोका देतील; चिराग पासवान यांची टीका

‘बाबा मला नेहमी म्हणायचे की…’, वडिलांच्या आठवणीत मनदीप सिंग भावूक

…तर राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही- उदयनराजे भोसले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या