बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईची लोकलसेवा बंद होणार नाही पण मुंबईकरांनो….

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल बंद करण्यात यावी अशी आग्रही मागणी होत होती. मात्र नागरिकांची गैरसोय लक्षात घेतला मुंबईमधली लोकलसेवा बंद होणार नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र मुंबईकरांनी अनावश्यक प्रवास टाळावा. येते काही दिवस त्यांनी घरबसल्या काम करावं, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई लोकलसेवा बंद होणार नाही, अशी माहिती दिली आहे. लाखो मुंबईकर रेल्वेने प्रवास करत असतात. त्यामुळे मुंबई लोकल जर बंद झाली तर साहजिक त्यांना याची झळ बसू शकते.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबई लोकलम तातडीने बंद करण्यात यावी, असा सल्ला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला दिला होता. मात्र आणखी एक दोन दिवस थांबून आणि परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असं पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे, मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. कोरेनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढू नये यासाठी आम्ही हा निर्णय घेत असल्याचं मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ अश्या शहरांना जोडणाऱ्या एकूण 23 गाड्या मध्य रेल्वेने रद्द केल्या आहेत. यामध्ये राजधानी एक्सप्रेससोबत डेक्कन एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस दुरांतो एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस मध्य रेल्वेने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय

अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबई रेल्वेने लढवली नामी शक्कल!

महत्वाच्या बातम्या-

सावधान… मुंबई-पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला!

पाकिस्तानवरही कोरोनाचा ‘अ‌ॅटॅक’, घेतला पहिला बळी तर 184 जणांना कोरोनाची लागण

कोरोनाने रेल्वेची चेन ओढली…. डेक्कन, प्रगती, हावडा, दुरांतो एक्सप्रेस या रेल्वे गाड्या रद्द!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More