९ ऑगस्टला मुंबईत घोंघावणार मराठा क्रांती मोर्चाचं वादळ

मुंबई | मराठा क्रांती मोर्चाचं शमलेलं वादळ पुन्हा एकदा घोंघवणार आहे. येत्या  क्रांती दिनी म्हणजेच 9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येईल. शिवप्रहार संघटनेचे प्रमुख संजीव भोर यांनी ही माहिती दिलीय. 

६ जूनला रायगडावर राज्यभिषेक दिनाचे निमित्त साधत गावोगावी महामोर्चाची माहिती देण्यासाठी व्यापक अभियान सुरू केले जाणार आहे. मोर्चा व्यवस्थापनाची रणनीती १३ जुलैला कोपर्डीत होणाऱ्या बैठकीत ठरवण्यात येणार आहे. तर १ जून रोजी होणाऱ्या शेतकरी संपाला मराठा म्हणून सहभागी होऊ, असं संजीव भोर यांनी म्हटलंय. 

बातमी लाईक करा, शेअर करा-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

14 Comments

 1. सर्व मराठा समाज बांधवाना एक विनंती आहे, मित्रांनो मुंबई मोर्चा अवघ्या दहा दिवसावरती आहे, आनी माझ्या मोबाईल वरती मराठा आणि मराठा समाजातील अनेक नावाने वेगवेगळे ग्रुप आहेत पण मला अस वाटत आहे या ग्रुप वरती मराठा समाजातील माझे मित्र,माझे बांधव आहेत का नुसते ग्रुपचे नावचं आहेत मराठा, कारण फेसबुक, व्हाट्सअप एकही पोष्ट, कॅमेन्ट मोर्चा बद्दल दिसत नाही, भावांनो थोड गंभीर व्हा, विचार करा एव्हडे मोर्चे काढले ते व्यर्थ घालू नका, मुंबई मोर्चाची तयारी करा, आपलेच काही समाज कंठक या सरकारच्या दावणीला बांधले गेले आहेत, पण आपणाला आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावावी लागेल, आता माघार नाही, एक मराठा लाख मराठा.????
  VASANT A.K. PATIL: आज मराठा महामोर्चा ची 9 ऑगस्ट तारीख तारांकित हाॅटेल मध्ये घोषित करण्यात आली. मराठा आरक्षण व शेतकरी व कोपर्डी घटना यासाठी मोर्चा होणार आहे.
  पण ही बैठक तारांकित होती. घोषणा केलेली समिती कोल्हापूर येथील भव्य शामियाना वजा हाॅल मध्ये तर जाहीर झालेली नाही ना.

  पण असो अखेर 9 ऑगस्ट जाहीर झालेली तिसरी तारीख. याला ही आमचा पाठिंबा.
  पण 30 मे ला मुंबई महामोर्चा होणार. कारण सर्व सामान्य मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी हा मोर्चा आवश्यक आहे.
  मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी 30 मे.
  शेती कामाच्या आधी शेतकरी प्रश्न मांडण्यासाठी 30 मे
  ना निवडणुका, ना परीक्षा फक्त मराठा प्रश्न म्हणून 30 मे
  कोणताही अतिरिक्त खर्च नाही फक्त सामान्य मराठा समाजाचे प्रश्न म्हणून 30 मे

  30 मे रोजी मुंबई महामोर्चा नंतर प्रश्न सोडवण्यासाठी आमरण उपोषण होणार.

  आपणही सहभागी व्हा ??

 2. मागासवर्गीय आयोगाकडे मराठा आरक्षणाचे प्रकरण गेलेले आहे…. या आयोगाचे काम कधीपर्यंत पुर्ण होईल???…. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाची भुमिका सकारात्मक आहे किंवा नाही, ते स्पष्ट करण्यात यावे…..

  • एक मराठा आता एक करोड़ मराठा सर्वना निवेदन आहे की मुम्बई मोर्चेला ययच आहे

   • एक मराठा लाख मराठा चलो मुंबई

    • संघटित रहा
     सरकार कोणतीही असो ते आंदोलन होउ द्यायच नाही हेच विचार करणार
     पण आपण नागे न जाता जिद्दीने समोर जाऊ ।।

 3. Yachich amhi kiti tari aturtene vat pahat hoto !THAMBAYACHA NAY ATA THAMBAYACHA NAY MARATHA AARAKSHAN MILAVILAYA SHIVAY GAPPA BASAYACHA NAY

  JAI SHIVAJI JAI BHAVANI

 4. एक मराठा लीख मराठा

  एक वादळ

 5. Maratha karanti Morcha ….

  Marathanchi Takat ….

  Ek Maratha , Lakh Maratha …….

Comments are closed.