मुंबई | अंधेरीत दुर्घटनाग्रस्त झालेला पूल मुंबई महापालिकेनं बांधला असला तरी त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे, असं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटलंय.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग सकाळच्या सुमारास कोसळला आहे. पण या पुलाच्या दुर्घटनेबाबतची जबाबदारी रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिका दोघांनीही झटकली आहे.
पुलाच्या देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाचीच असून मुंबई महापालिकेकडून देखभालीसाठी खर्चही दिला जात होता, असंही महापौरांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल
-काँग्रेसचा संजय निरूपम यांना धक्का; पदावरून उचलबांगडी?
-धक्कादायक!!! अंधेरीमध्ये पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर कोसळला
-30 लाखांचा चेक फडकवत भाजप नेता म्हणाला, ‘बोला आता तरी तिकीट देणार का’?
-आम्ही आमदार तुमचे नोकर आहोत- बच्चू कडू