महाराष्ट्र मुंबई

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोनावर मात!

मुंबई | मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

10 सप्टेंबरला किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट करत माहिती दिली होती.

कोरोनाची लागण झाल्याने किशोरी पेडणेकरांवर सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना उद्या डिस्चार्ज देण्यात येईल. त्यानंतर त्यांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे.

किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन आणि कोरोना काळात मुंबईतील अनेक रुग्णालये आणि हॉटस्पॉट्सना भेटी दिल्या. कोरोना काळात त्यांनी ग्राऊंडवर उतरुन कोव्हिड योद्ध्यांचं मनोबल वाढवण्याचं काम केलं.

महत्वाच्या बातम्या-

‘ती’ अभिनेत्री काय नाव घ्यायच्या लायकीची नाही- अनिल देशमुख

अभिनेत्री मलायका अरोराची कोरोनावर मात

आनंदाची बातमी! राज्यात आज 26 हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी

“सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना अटक करा, नावं जाहीर करा”

कोरोनामुक्त भाजप आमदाराचा प्रताप; विनामास्क मंदिरात केला डान्स

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या