बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तो 15 मिनिटे लटकत होता, जर कर्मचारी प्रशिक्षित असते तर…”

मुंबई | मुंबईमधील करी रोडवरील एका 60 मजली इमारतीच्या 19 व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. त्यानंतर काही वेळातच ती आग संपूर्ण मजल्यावर पसरली. एक व्यक्ती स्वत:चा जीव वाचवण्यासाठी त्या इमारतीच्या बाहेर जवळपास 15 मिनिटे लटकत होता. त्यानंतर काही वेळात तो खाली पडला आणि त्याचा दुर्दैवी निधन झालं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शोक व्यक्त केली आहे.

शुक्रवारी करी रोड परिसरात असलेल्या वन अविघ्न पार्कला आग लागली. त्या भीषण आगीत जीव वाचवण्याचा प्रयत्नात मजल्यावरून खाली पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र आणीबाणीच्या प्रसंगी इमारतीमधील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवले असते, तर त्या व्यक्तीचे प्राण वाचले असते, असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलं आहे.

इमारतीला आग लागल्यानंतर तो व्यक्ती  15 मिनिटे बाहेर लटकत होता. वन अविघ्न पार्क ही उच्चभ्रू सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये जवळपास 200 पेक्षा अधिक सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी राहतात. मात्र हे सर्व अप्रशिक्षित कर्मचारी असल्याचं मला वाटतंय. त्यांनी लवकर समयसुचकता दाखवली असती तर त्या व्यक्तीचा जीव वाचला असता, असं किशोरी पेडणेकरांनी म्हणाले.

दरम्यान, इमारतीच्या मजल्यावरून पडल्यानंतर त्या व्यक्तीला लगेचच दवाखान्यात नेण्यात आले, मात्र रूग्णालयातच डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले. अरूण तिवारी असं त्या व्यक्तीचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसचं टेन्शन वाढलं; पंजाबच्या राजकीय मैदानात आता ‘हा’ पक्ष करणार एन्ट्री

‘…त्यामुळे यावेळेस भारताचा पराभव होईल’; हाय होल्टेज सामन्यापूर्वी बाबर आझमचं मोठं वक्तव्य

‘त्या’ प्रकरणात पार्थ पवारांचं नाव घेताच अजित पवार भडकले, म्हणाले ‘पोरांची नावं घेऊन…’

धक्कादायक! जीव वाचवताना हात सुटला, खाली पडून रहिवाशाचा मृत्यू

‘त्याला काही लाज, लज्जा, शरम आहे की नाही?’; भर पत्रकार परिषदेत अजित पवार संतापले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More