बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ऑन फिल्ड; गेट वे ऑफ इंडिया परिसरात जाऊन केली पाहणी

मुंबई | तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. मुंबई आणि किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव, वरळी सी- फेस, दादर या चौपाट्यांची पाहणी करून बृहन्मुंबई महापालिकेने समुद्र किनाऱ्यांवर केलेल्या तयारीचा आढावा घेतला. तसेच मुंबईकर नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असं आवाहन केलं.

जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली असून मनुष्यहानी मात्र कुठेही झाली नाही. वृक्ष कोसळण्याच्या घटनांबाबत संबंधित त्या-त्या विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना भ्रमणध्वनीद्वारे अवगत करत असल्याचं महापौर म्हणाल्या.

वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना किशोरी पेडणेकर यांनी रेनकोट घालून गेट वेच्या परिसरात दाखल झाल्यात. यावेळी त्यांच्यासोबत पालिकेचे इतर कर्मचारी सुद्धा उपस्थितीत होते. शहरावर वादळाचं संकट जरी टळलं असलं तरी समुद्रकिनारी परिसरात जाऊ नये, गरजेचं काम असल्यास घराबाहेर पडावं, असं आवाहन मुंबई पालिकेकडून करण्यात आलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

माझा प्रणीतदादा गेला… मित्राच्या मृत्यूनं प्रविण विठ्ठल तरडे हळहळले!

“एकाचं लक्ष मुंबईवर अन् दुसऱ्याचं बारामतीवर, उर्वरीत महाराष्ट्र वाऱ्यावर”

देऊळबंद चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी यांचं निधन

भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवल्याचा भाजपचा आरोप, अजित पवार म्हणाले…

“…तर पुढच्या दोन आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात येईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More