बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आमदार झाला, मंत्री झाला, पण जीव मात्र अजूनही …’ किशोरी पेडणेकरांचा शेलारांना टोला

मुंबई | भाजप नेते आशिष शेलार (BJP Leader Aashish Shelar) आणि महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pedanekar) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतोच आहे. आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप केला होता. त्यांनी बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत महाविकास आघाडीच्या नेत्याला पाहिल्याचा दावा केला होता. यावरून किशोरी पेडणेकर यांनी शेलारावंर खोचक शब्दात टीका केली आहे.

“बॉलिवूड पार्टीत महाविकास आघाडीतील नेता होता असा आरोप आशिष शेलारांनी केला आहे. कोण मंत्री त्या पार्टीत होता हे शेलारांनी स्पष्ट करावं. शेलार आणि इतर लोक बेछूट आरोप करून जनतेची फसवणूक करत आहेत. तुमची ही कार्यपद्धती आम्हाला कळली आहे,” अशा शब्दात किशोरी पेडणेकरांनी शेलारांवर निशाणा साधला आहे.

यावेळी पेडणेकर शेलारांना सुनावत म्हणाला की, “आमदार झाला, मंत्री झाला, पण जीव मात्र अजूनही महापालिकेतच घुटमळत आहे” असा टोलादेखील लगावला आहे. पुढे त्या म्हणाल्या, “कशासाठी?, जर तुमचा जीव घुटमळत असेल आणि त्या जीवाला मोकळे करायचे असेल तर पुरावे देऊन आरोप सिद्ध करा. उगाच आरोप करू नका,”

दरम्यान, करण जोहर याने दिलेल्या पार्टीत अनेक कलाकारांनी कोरोनाची लागण झाल्याच समोर आलं होत. या पार्टीत ठाकरे सरकारचा नेता असल्याचा आरोप आशिष शेलारांनी केला होता. शिवाय या नेत्याने पुढे यावे. लोकांच्या आरोग्याशी खेळू नये, असंही आशिष शेलार म्हणाले होते. त्यांच्या या आरोपावरून किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“2 महिन्यांपासून कुठेय पठ्ठ्या…”रावसाहेब दानवेंची जीभ पुन्हा घसरली

‘बाजारू अमोल मिटकरी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तळवे चाटून झाले असेल तर…’; राम सातपुतेंचा हल्लाबोल

लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, आता मिळणार ‘ही’ मोफत सुविधा

लस घेतलेल्या ‘इतक्या’ भारतीयांना Omicronचा धोका, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

‘सत्तेत मांडीला मांडी लावून बसता आणि इथे एकमेकांना…’; प्रविण दरेकरांचा शिवसेनेवर घणाघात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More