महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात, पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही- किशोरी पेडणेकर

मुंबई | मुंबई महापालिका क्षेत्रात पुन्हा पूर्ण लॉकडाऊनची गरज नाही. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

मुंबईत पुणे, ठाण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाबाबत मुंबईतील परिस्थिती या शहरांच्या तुलनेत पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्यामुळे पुणे किंवा ठाणे पुन्हा लॉकडाऊन करावे लागले, तशी गरज मुंबईला नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

जर पुन्हा मुंबईत लॉकडाऊन होऊ नये, असं वाटत असेल तर सर्वांनी सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर केला पाहिजे. सतत सॅनिटायझर वापरावं. जर ताप असेल तर डॉक्टरकडे जा, असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुंबईत आता बऱ्यापैकी सुधारणा होत आहे. मुंबईत डबलिंग रेट हा 50 दिवसांवर पोहोचला आहे. याआधी आपण ज्या टेस्टिंग करत होतो. त्या दोन ते चार हजारापर्यंत जात होत्या. तेव्हा कोरोना रुग्णांची संख्या ही हजार ते दीड हजारपर्यंत होती. मात्र आता जवळपास सात ते आठ हजारपर्यंत टेस्टिंग करत आहोत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

भाजपला घोडेबाजाराची सवय आणि पैशाचा उन्मात आहे- यशोमती ठाकूर

बारावीच्या निकालात ‘या’ मुलीने मिळवलेले गुण वाचून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल!

‘येत्या दोन महिन्यात परीक्षा घेणं अशक्य’; परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम

“RSS ने धारावी कोरोनामुक्त केली असेल, तर नागपुरात संघाचं मुख्यालय, तिथे कोरोनाचा कहर कसा?”

‘गुगल भारतात इतक्या हजार कोटींची गुंतवणूक करणार’; सुंदर पिचई यांनी केली मोठी घोषणा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या