महाराष्ट्र मुंबई

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे मोठे बंधू सुनिल कदम यांचा शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या सात दिवसांपासून सुनिल कदम यांच्यावर महापालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या एप्रिल महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर या देखील होम क्वारंटाइन झाल्या होत्या. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होते. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन झाल्या होत्या. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर या 14 दिवस घरीच होत्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंविस वाढत आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण संख्या आहे. एकट्या मुंबईसह उपनगरात कोरोनाचे 1 लाख 14 हजार 284 रुग्ण आहेत. त्यापैकी 87 हजार 074 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 6353 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 57,117 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 764 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 16 लाखांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 36,511 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 महत्वाच्या बातम्या-

दुचाकीवरून प्रवास करताना लोकल ब्रँडचे हेल्मेट वापरल्यास होणार दंड!

अविनाश… आम्ही ठाण्याला येतोय, कोण अडवतंय बघूया- संदीप देशपांडे

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची किंमत अनलिमिटेड- अशोक गेहलोत

वाढदिवस विशेष: तापसी पन्नूचा अभियंता ते बॉलिवूडचा प्रवास वाचून तुम्ही थक्क व्हाल….!

या सरकारचं स्टेअरिंग कुणाच्या हाती?, उद्धव ठाकरेंचं भन्नाट उत्तर

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या