मुंबईकरांचे हाल, पुन्हा मेगा ब्लॉकचा फटका; ब्लॉक कालावधी आणखी वाढला

Mumbai News

Mumbai News l मुंबई महापालिकेने (BMC) कर्नाक पुलाचे (Carnac Bridge) गर्डर (Girder) बसवण्याचे काम अद्याप वेळेत पूर्ण न केल्याने मुंबईकरांना (Mumbaikars) आणखी दोन दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवारी मेगा ब्लॉकचा (Mega Block) त्रास सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वेने (Central Railway) कर्नाक पुलाचा गर्डर बसवण्याकरता शनिवारी आणि रविवारी रात्री पॉवर ब्लॉक (Power Block) घेणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, या पुलाचे काम अद्याप न झाल्याने आता ब्लॉक कालावधी आणखी दोन दिवसांसाठी वाढवण्यात आला असून, मुंबईकरांची आठवड्याची सुरुवातच ब्लॉकने होणार आहे.

मस्जिद बंदर (Masjid Bunder) येथील १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका करत आहे. पुलाचा गर्डर बसवण्याकरिता पालिकेने रेल्वेला ब्लॉक घेण्याची विनंती केली होती. या पुलाच्या कामासाठी रेल्वेने २५, २६, २७ जानेवारी ते १, २, ३ फेब्रुवारी दरम्यान कर्नाक उड्डाणपुलाच्या कामासाठी मुख्य मार्गावर (Main Line) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते भायखळा (Byculla) व हार्बर मार्गावर (Harbour Line) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोड (Wadala Road) स्थानकादरम्यान पॉवर ब्लॉक जाहीर केला होता.

काम संथगतीने सुरू; एक जण जखमी :

शनिवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी नियोजित पॉवर ब्लॉक घेण्यात आला. तो सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत चालणार होता. मात्र, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कामाच्या ठिकाणी वेळेत न पोहोचल्याने आणि गर्डर बसवण्याच्या कामात काही तांत्रिक त्रुटी (Technical Issues) आल्याने काम संथ गतीने सुरू आहे. रात्री दहा वाजता जे काम सुरू होणे अपेक्षित होते, ते काम सुरू होण्यास अधिकचा वेळ लागला. या गर्डर बसवण्याच्या कामात एक व्यक्ती जखमी (Injured) झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे रेल्वेला शनिवारचा रात्रकालीन ब्लॉक अचानक वाढवण्याची वेळ आली. हा पॉवर ब्लॉक सकाळी दहा वाजेपर्यंत चालला.

Mumbai News l गर्डर बसवण्याचे काम अपूर्ण; आणखी दोन दिवस ब्लॉक :

पालिकेचे गर्डर बसवण्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने पालिकेच्या या कामासाठी मध्य रेल्वेला आणखी दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक घ्यावा लागणार आहे. आजचा म्हणजे रविवारचा रात्रकालीन ब्लॉक हा रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार असून पहाटे ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत चालणार आहे. याचा परिणाम म्हणजे शनिवार आणि रविवारी सोसावा लागलेला मेगा ब्लॉकचा त्रास मुंबईकरांना आता सोमवार आणि मंगळवारी देखील सोसावा लागणार आहे.

News Title: mumbai-mega-block-extended-due-to-pending-work-of-carnac-bridge

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .