मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल जनतेशी संवाद साधताना मेट्रो कारशेडवर आपलं मत मांडलं. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन पंतप्रधानांना भेटण्याचा सल्ला दिला आहे.
टीम इंडिया असं समजून काम करा उद्धवजी… आताही वेळ आहे. आरे कारशेडच्या प्रश्नांवर उद्धवजी यांच्या वक्तव्याचे भारतीय जनता पार्टी स्वागत करेत. पण मी राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, या प्रकल्पाचे 80 टक्के काम आमच्या सरकारच्या कार्यकाळात झालं असल्याचं पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.
जर तुमच्या उपाययोजना वेगळ्या आणि मुंबईच्या हितासाठी असत्या आणि त्यासाठी तुम्हाला केंद्राची जागा हवी होती, तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने पंतप्रधानांकडे निवेदन दिले असते. तुमच्याकडे प्रारंभी वेळ होता की, तुम्ही देवेंद्रजींना सोबत घेऊन सर्व तज्ज्ञांच्या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ शकला असता. पण आजही मेट्रो कारशेडवर तुमचे सर्व निवेदन अपूर्ण असल्याचं पाटलांनी पत्रात सांगतिलं.
दरम्यान, जूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन मोदीजी आणि केंद्राच्या इतर विभागातील मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढून मुंबईच्या हिताचा निर्णय घेऊ शकता. एक जनप्रतिनिधी आणि सर्वप्रथम महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून हाच माझा तुम्हाला सल्ला असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
टीम इंडिया अस समजून काम करा उद्धव जी… आताही वेळ आहे ! pic.twitter.com/oBNLRrgKv6
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 20, 2020
थोडक्यात बातम्या-
भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्नात नेतेमंडळींकडूनच कोरोनाच्या नियमांना केराची टोप
मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत- उद्धव ठाकरे
आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरती नको- विनायक मेटे
…तर दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेवटचं आंदोलन करेल- अण्णा हजारे
“…तर मंदिरासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक आत्म्याचा तो अवमान ठरेल”