मुंबई | मुंबईतल्या ज्या कंपन्या 50 टक्के कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देत नसतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिला. ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याचे आदेश दिले आहेत.
पुढील दोन दिवसांत मुंबईतील खाजगी कंपन्यांमध्ये मी भेट देऊन तपासणी करणार आहे. ज्या कंपन्या निम्म्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगत नाहीत, त्यांच्यावर कलम 188 अंतर्गत दंडाची कारवाई होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुंबई महापालिका मुख्यालय आणि वॉर्ड ऑफिसमध्ये नागरिकांच्या तक्रारी ईमेल, टेलिफोन नंबर (1916) वर घेण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली आहे.
दरम्यान,राज्यातील कोरोनाग्रस्ताचा आकडा 42 वर गेला आहे. मुंबईत 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!
“…तर नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ- राजेश टोपे
महत्वाच्या बातम्या-
संसार करत करत अभ्यास… पीएसआयच्या परीक्षेत ‘तिने’ मिळवलं घवघवीत यश!
लग्न करू शकता बरं का… लग्न समारंभावर बंदी नाही- पुणे जिल्हाधिकारी
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनचं जनतेला आवाहन
Comments are closed.