बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोनाबाधिताला बेड मिळाला नाही तर…’; मुंबई महापालिका आयुक्त अॅक्शन मोडमध्ये

मुंबई | कोरोेना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढतान दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात कोरानाची दुसरी लाट आल्यासारखं चित्र निर्माण झालं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाग्रस्तांना बेड कमी पडत होते तर कुठे ऑक्सिजनची कमतरता भासत होती. अशाच प्रकारे मुंबईच पुन्हा रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बेड उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे.

कोरोनाबाधितांना बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी येत असताना बेड मिळाला नाही, वॉर्ड वॉर रुमकडून फोन आला नाही, तर मला थेट फोन करा, मी बेड उपलब्ध करुन देईन असं आश्वासन इक्बालसिंह चहल यांनी मुंबईच्या जनतेला केलं आहे.

उच्चभ्रु लोक वशिल्याचा वापर करुन परस्पर लॅबकडून कोरोना रिपोर्ट घेतात आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवतात पण त्यामुळे बेड व्यवस्थापन साखळी तुटते. वॉर्ड वॉररुमकडून रुग्णाची दररोज चौकशी केली जाते आणि लक्षणे असल्यास तसेच कोमॉर्बिड व्यक्तींना सरकारी किंवा खाजगी रुग्णालय अशा त्यांच्या मागणीनुसार बेड उपलब्ध करुन दिला जात असल्याचं इक्बालसिंह चहल यांनी सांगितलं.

दरम्यान,जम्बो कोविड सेंटर, खाजगी रुग्णालयातील 80% बेड पुन्हा सक्रिय करणार असून आठवड्याला टप्प्याटप्प्याने बेडची संख्या वाढवत नेण्यात येणार आहे. डॅशबोर्डवर 13 हजार बेड आहेत. येत्या आठवड्यात 20 हजार बेड उपलब्ध होणार असल्याची माहिती इक्बालसिंह चहल यांनी दिली.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यातील ‘त्या’ सामूहिक बलात्काराचा उलगडा, नराधमाने शारीरिक संबंध ठेवू न दिल्याने चालवली होती गोळी

साप मुंगसाच्या भांडणाचा थरार पाहून तूम्हीही व्हाल थक्क! पाहा व्हिडीओ 

शरद पवार, अमित शहांच्या भेटीवर ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य; ‘आगे आगे देखो होता है क्या’

धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचं औषध समजून प्राशन केलं विषारी औषध अन्…

‘मुंबई इंडियन्सला हरवणं ही सर्वात मोठी गोष्ट’; भारताच्या ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More