मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिला दसरा मेळावा आहे. याविषयी बोलत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात एक मोठं भाष्य केलं आहे.
संजय राऊत म्हणाले, आगामी महापालिका निवडणुका या महाविकास आघाडीच्याच नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत. महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता येईल.
राऊत पुढे म्हणाले, अनेकजण म्हणाले होते की 11 दिवसांत सरकार पडेल. गणपतीत सरकारचे विसर्जन होईल. मात्र आता दसरा आला आहे. आमच्याकडे सर्व तयारी झाली असून त्यांच्याच खाली बॉम्ब फुटणार आहेत.
“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिला दसरा मेळावा आहे. सर्वत्र कोरोनाचं संकट नसतं तर आज शिवतीर्थावर महापूर आला असता,” असंही राऊत म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
कोरोना लसीचं राजकारण करण्याइतके मुख्यमंत्री कोत्या मनाचे नाही- संजय राऊत
आरक्षणाच्या मुद्द्यावर कंगणा राणावतने मांडलं मत, म्हणाली…
चीनशी लढा देण्यासाठी आपल्याला ताकद आणखी वाढवावी लागणार- मोहन भागवत
“आम्ही उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील बलात्काराच्या घटना लपवत नाही”
धक्कादायक! बिहार निवडणूकीच्या प्रचारादरम्यान उमेदवाराची गोळ्या झाडून हत्या
Comments are closed.