बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय?”

मुंबई | विकास निधी वाटपावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुंबईकरांसोबत दुजाभाव केल्याचं लक्षात असु द्या असं म्हणत मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे का?, असा प्रश्न आशिष  शेलार यांनी शिवसेनेला केला आहे.

कमी विकास निधी देण्यात आल्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे. याचदरम्यान आशिष शेलारांनी याबाबत आपल्या ट्वीटर अकाऊंट वरुन शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. 650 कोटी विकास निधीपैकी शिवसेना 97 नागरिकांना 230 कोटी, काँग्रेस 29 नगरसेवक 81 कोटी तसेच भाजप 83 नगरसेवक 60 कोटी आणि हो स्थायी समिती अध्यक्षांना एकट्याला 30 कोटी, असा निधी दिला असल्याची माहिती अशिष शेलारांनी दिली आहे.

 

 

कोरोना काळात 1600 कोटी खर्च करण्यात आले होते. या कारणामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. मात्र आता मोठ्या प्रकल्पांसाठी 3 ते 4 हजार कोटी निधीची गरज असून यावेळेस अंतर्गत निधीतून कर्ज उचलणं शक्य नसल्यामुळे शेअर बाजारातून कर्जरोख्यातून पैसे उभारण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहे. यावरून शेलारांनी सरकारवर टीका केलीये.

एकीकडे हेरिटेज वॉक सुरू करुन ऐतिहासिक मुंबई महापालिकेची वास्तू खुली केलीत. दुसरीकडे कर्ज रोखे काढून महापालिकेला बाजारात उभी केलीत. वा! अखेर श्रीमंत महापालिकेची शोभा व्हायची ती झालीच, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

‘चित्रा वाघच तुम्हाला पुरुन उरणार आहे’; चित्रा वाघ आक्रमक

शरद पवार माझा बापच आहे, मला आज त्यांची आठवण येतीये- चित्रा वाघ

…म्हणून मुंबईत कोरोना बळावतोय- आनंद महिंद्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर…

“नगराळे यांचं वक्तव्य ज्यांना धक्कादायक वाटतं ते मुर्खांच्या नंदनवनात फिरतायेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More