केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बंगल्यावर होणार कारवाई?, BMC चा पुन्हा दणका
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणेविरूद्ध शिवसेना, असा संघर्ष पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणेेंना मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली होती. त्यातच आता पुन्हा एकदा नारायण राणे यांना मुंबई महापालिकेच्या के वेस्ट विभागाने दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे.
येत्या 15 दिवसांमध्ये अनाधिकृत बांधकाम पाडा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा नारायण राणे यांना देण्यात आला आहे. नारायण राणे यांना अल्टीमेटम दिल्यामुळे राणेंवर कारवाई होणार का?, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. नारायण राणे यांचा जुहू येथे अधिश नावाचा बंगला आहे. सदर बंगल्याची महापालिकेकडून दोनवेळा पाहणी करण्यात आली आहे.
नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याच्या बांधकामाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. अधिश बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन करण्यात आलं आहे, अशा प्रकारची तक्रार करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते संजय दौंडकर यांनी मुंबई महापालिकेमध्ये यांसंदर्भात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, मुंबई महापालिका कायदा 1888 च्या सेक्शन 488 नुसार मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर नारायण राणे यांच्या अनधिकृत बांधकामासंदर्भात महापालिका आयुक्तांना लीगल नोटीस पाठवणार आहेत. महापालिकेनं 15 दिवसांचा अल्टिमेटम दिल्याने कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
थोडक्यात बातम्या-
“शिवसेनेसारख्या पक्षानी महाराष्ट्रामध्ये जातीभेदाचं बीज पेरलंय”
Deltacronचा पुन्हा धुमाकूळ, ‘या’ ठिकाणी आढळून आले नवे रूग्ण
“देश सध्या चारच लोक चालवत आहेत, दोघं विकतात तर 2 जण खरेदी करतात”
“संजय राऊतांचं असं आहे की, दिन मे बोले जय श्रीराम, और रात को लेते सौ सौ ग्राम”
‘चला दापोली…’; किरीट सोमय्यांच्या ट्विटने अनिल परबांचं टेंशन वाढलं
Comments are closed.