बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राणे-शिवसेना वाद टोकाला! नारायण राणेंचा ‘अधिष’ महापालिकेच्या रडारवर

मुंबई | संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. नितेश राणेंना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. अशातच आता नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाबत मुंबई महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्यानं राजकारण पेटलं आहे.

जुहू येथील ‘अधिष’ या नारायण राणेंच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार महापालिकेकडे आली होती. त्यानंतर पालिकेचे अधिकारी पोलीस संरक्षणात राणेंच्या बगल्यावर गेले होते. पण परिवारातील सदस्यांनी सोमवारी येण्याची विनंती केल्यानं आता पथक सोमवारी जाणार आहे. तपासणीत काही अनधिकृत बांधकाम आढळलं तर कारवाई होण्याची शक्यता आहे.

चटईक्षेत्र उल्लंघन, बेकायदा बांधकाम असा प्रकार आढळल्यास पालिका प्रशासन राणेंना नोटीस बजावून बांधकाम पाडण्याची विनंती करू शकते. राणेंनी लवकर बांधकाम पाडले नाही तर पालिका आपला विशेषाधिकार वापरून बांधकामावर कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका प्रशासनानं नोटीस पाठवल्यापासूनच वादाला सुरूवात झाली आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या या कारवाईच्या सुचक संकेतानंतर आता नितेश राणेंनी पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. सरकार विरोधात बोलतात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“पवार कुटुंबीयांचे शेअर्स आहेत की नाहीत…”; राजू शेट्टींचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

लेकीमुळं उद्भवला शिवसेना-राष्ट्रवादी वाद; अखेर बाबांना द्यावं लागलं स्पष्टीकरण

‘मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी शिवसेनेने दिली’, किरीट सोमय्यांच्या दाव्याने नवी खळबळ

ऐतिहासिक निर्णय, अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील तब्बल ‘इतक्या’ दोषींना फाशीची शिक्षा

‘सगळे हिशेब ह्याच जन्मात चुकते करणार’, निलेश राणेंची तोफ कडाडली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More