बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुंबई तुंबली आम्ही नाय पाहिली’; शिवसेनेच्या महापौरांचा अजब दावा

मुंबई |  मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पाऊसाने दमदार हजेरी लावलीये. मुंबईच्या उपनगरात पाणी तुंबलेलं पाहायला मिळतंय. मात्र मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत पाणी कुठेच तुंबले नाही, असा हास्यास्पद दावा केला आहे.

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल रेल्वेसुद्धा ठप्प होतीये. रेल्वे ट्रॅकवर साचलेला कचरा येतोय. मात्र महापालिकेचे महापौर यांनी या सर्व गोष्टींचा इन्कार केला आहे.

मुंबई कुठेच तुंबली नाही. तुम्ही उगीचच प्रश्न विचारता आहात. मुंबईत सारं काही आलबेल आहे. कुठेही ट्रॅफिक जॅम आहे. एकंदरित मुंबईचं जनजीवन कुठेही विस्कळीत झालेलं नाही, असं महाडेश्वर म्हणाले आहेत.

दरम्यान, महापौरांच्या या दाव्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-झायरा वसीमचा निर्णय अन् अबू आझमी आणि शिवसेनेतच भांडणं…!

मोहन भागवत झाले डिजीटल; भागवतांनी केली ट्विटरवर एन्ट्री

-भारतीय संघाला धक्का; दुखापतीमुळे हा अष्टपैलू खेळाडू विश्वचषकातून बाहेर

-पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंना मोठा धक्का; वंचितकडून ‘हा’ नेता निवडणुकीच्या रिंगणात!

-तुम्हाला 8 दिवसांत परिणाम दिसतील; रामदास कदम यांचं अजित पवारांना उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More