Mumbai News | मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशात एक धक्कादायक घटना नवी मुंबईतून समोर येत आहे. नवी मुंबईत एक तीन मजली इमारत कोसळली आहे. इंदिरा निवास असे या इमारतीचे नाव असून येथे बचावकार्य युद्ध पातळीवर करण्यात येत (Mumbai News) आहे.
बचाव पथकाने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले आहे. सुरुवातीला अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, त्यानंतर ढिगाऱ्याखाली दोघे अडकले असून इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.
नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली
बेलापूर विभागातील शहाबाज गावातील इंदिरा निवास जी प्लस 3 मजली इमारत ही पहाटे कोसळली आहे. या निवासमध्ये एकूण 13 सदनिका होत्या. त्यात 26 कुटुंब राहत असल्याची माहिती समोर येत आहे.
इमारत ढासळण्याची माहिती (Mumbai News) मिळताच NDRF, मुंबई पोलीस, अग्निशमन दल आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. सध्या इमारत कोसळण्यामागील नेमके कारण समोर आले नाही.मात्र, याचा तपास केला जाणार असल्याचं म्हटलं जातंय.
घटनास्थळी बचाव पथकाकडून युद्धपातळीवर काम सुरू
बिल्डिंगला सर्व प्रथम हादरे बसले त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक बाहेर पडले मात्र तीन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती समोर आली होती. घटनास्थळी बचाव पथकाकडून दोघांना बाहेर काढण्यात आलं असून एकाचा शोध अद्याप सुरू आहे.
प्रत्यक्षदर्शी आणि इमारतीतील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास बिल्डिंग कोसळली. बिल्डिंगला अगोदर हादरे बसले, त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक बाहेर पडले. मात्र, दोन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती मिळाली. ही इमारत 2013 मध्ये बांधण्यात आली होती. अजून येथे (Mumbai News) एका बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे.
News Title : Mumbai News 3 floor building collapsed
महत्त्वाच्या बातम्या-
या आठवड्यात सोन्याचा मोठा दिलासा; 10 ग्रॅम सोनं फक्त..
दिग्दर्शक फराह खानला मातृशोक, मेनका इराणी यांचं निधन
अनेक महिने वापरताय एकच टूथब्रश?, मग ही बातमी वाचाच
‘भावी मुख्यमंत्री संघर्ष कन्या’, पंकजा मुंडेंच्या वाढदिवशी झळकले बॅनर